यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना देण्यात येणार आहे. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने आशा भोसले यांना गौरविण्यात येणार आहे. अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातील कामगिरीबद्दल, शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधील योगदानाबद्दल आणि धनंजय दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. १९८८ सालापासून म्हणजेच गेल्या ७५ वर्षांपासून मंगेशकर परिवार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी करत आले आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.