News Flash

अमोल कागणेचं आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण

अमोल कागणेने 'हलाल', 'लेथ जोशी', '३१ ऑक्टोबर', 'परफ्युम' यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.

अमोल कागणे

‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘परफ्युम’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा अमोल कागणे आता लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मिलिंद उके दिग्दर्शित ‘मान्सून फुटबॉल’ या बहुचर्चित चित्रपटातून अमोल अभिनयाची नवी सुरूवात करणार आहे.

‘मान्सून फुटबॉल’ या चित्रपटामध्ये अमोल एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.

लग्न झाल्यावर मुली त्यांच्या संसारात रमतात. यामध्ये अनेक वेळा त्यांच्या आवडीनिवडी मागे पडत जातात. याच महिलांवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. गृहिणी झाल्यावर आपली पुसलेली ओळख पुन्हा मिळविण्यासाठी या महिलांनी दिलेला लढा यात दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फुटबॉल या खेळावर आधारित या चित्रपटाचं कथानक असून यात महिलांना साडीमध्ये फुटबॉल खेळताना पाहता येणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मान्सून फुटबॉल’ या चित्रपटाव्यतिरिक्त अमोल ‘बाबो’, ‘अहिल्या’, ‘झोलझाल’, ‘भोंगा’, ‘तुझं माझं अॅरेंज मॅरेज’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता आणि प्रस्तुतकर्ता म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर अमोल अभिनेता म्हणूनही ओळख निर्माण करेल, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:44 pm

Web Title: amol kagane debut in marathi movie monsoon football
Next Stories
1 #MeToo : नरेंद्र मोदींनी महिलांच्या बाजूने उभं राहायला हवं – सोना मोहपात्रा
2 Video : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री
3 #MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X