News Flash

अमोल कोल्हेच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण; वडिलांसोबत साकारतेय भूमिका

'कालपर्यंत 'दमलेल्या बाबाची कहाणी' ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते..'

अमोल कोल्हे

संभाजी राजांचा दैदिप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ करत आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत संभाजी राजे साकारणाऱ्या अमोल कोल्हेच्या मुलीने आता छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे आद्या कोल्हे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

‘कालपर्यंत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते… एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, हावभाव, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे ‘हे चुकलं’ असं बिनधास्त सांगू शकतो,’ अशी पोस्ट त्याने फेसबुकवर लिहिली.

वाचा : शाहरुखच्या ‘झिरो’वर भारी पडला KGF 

आद्या या मालिकेत स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारत आहे. सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली. आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे. त्यामुळे आद्यापेक्षा जास्त तिचे बाबा म्हणजेच अमोल कोल्हे अधिक उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 4:08 pm

Web Title: amol kolhe daughter debut on small screen in swarajya rakshak sambhaji serial
Next Stories
1 आमिरसोबतच्या नात्याबद्दल फातिमा म्हणते, कुछ तो लोग कहेंगे
2 Flashback 2018 : सुपरहिट सेलिब्रिटींचे सुपरफ्लॉप चित्रपट !
3 कॅन्सरग्रस्त मुलांसोबत ऐश्वर्याने साजरा केला ख्रिसमस
Just Now!
X