24 February 2021

News Flash

अमोल गुप्तेचा आगामी चित्रपट फॉक्स स्टारबरोबर

'स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा अमोल गुप्ते आणि फॉक्स स्टार त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.

| June 24, 2013 07:06 am

‘स्टॅन्ली का डब्बा’ या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा अमोल गुप्ते आणि फॉक्स स्टार त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. चित्रपट समीक्षकांनी नावजलेल्या अमोल गुप्ते यांच्या ‘स्टॅन्ली का डब्बा’ या चित्रपटाने जगभरात पंधरा ठिकाणी प्रवास केल्या नंतर येत्या २९ तारखेला तो जपानमध्ये प्रदर्शित होत आहे. गुप्ते म्हणाले, या उन्हाळ्यात मी एका नवीन चित्रपटाची सुरुवात करीत असून, फॉक्स स्टारने माझ्यावर विश्वास ठेऊन सदर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये माझ्यासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एका चांगल्या संकल्पनेच्या चित्रपटाचे आम्ही भागीदार असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे फॉक्स स्टारच्यावतीने सांगण्यात आले.  फॉक्स स्टार स्टुडिओचे कार्यकारी प्रमुख विजय सिंग म्हणाले, अमोल आणि दीपाच्या आगामी चित्रपटाचे आम्ही भागीदार असल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. चित्रपट निर्मितीत अमोलची स्वत:ची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे आणि त्याचे ‘भावनाप्रधान नैतिकतापूर्ण चित्रपट’ हे तत्वज्ञान प्रेरणा देणारे असून नेहमीच्या वाटेने न जाणारे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 7:06 am

Web Title: amole gupte partners with fox star studios for his next film
Next Stories
1 ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये अमिताभऐवजी नसिरुद्दीन शाह
2 जॉन अब्राहम करणार बॉक्सिंगचा प्रचार
3 ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’मध्ये सोनाक्षी झाली यासमीनची जासमीन
Just Now!
X