News Flash

बेरोजगार भाडेकरुंना अभिनेत्रीने केली मदत; माफ केलं थकित भाडं

लॉकडाउनमुळे देशभरातील हजारो लोक झाले बेरोजगार

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेत्री आमृता राव आपल्या भाडेकरुंच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. तिने आपल्या भाडेकरुंचं थकीत भाडं माफ केलं आहे.

अमृता अभिनयासोबत रिअल इस्टेट व्यवसायातही कार्यरत आहे. तिने आपले अनेक फ्लॅट भाड्याने देखील दिले आहेत. तिच्या काही फ्लॅट्समध्ये सर्वसामान्य लोक भाड्याने राहतात. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्यांपैकी काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उद्भवला आहे. IANS ला दिलेल्या मुलाखतीत तिने अशा भाडेकरुंचं थकित भाडं माफ केल्याचं सांगितलं आहे. अमृताच्या या निर्णयामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अमृता भारतीय सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘मै हू ना’, ‘मस्ती’, ‘ठाकरे’, ‘जॉली एल एल बी’, ‘द लेंजंट ऑफ भगत सिंग’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:11 pm

Web Title: amrita rao decides to forgo rent of tenants mppg 94
Next Stories
1 FIR मालिकेचे निर्माते अन्य ठिकाणी काम करु देत नाहीत; कविता कौशिकचा खुलासा
2 Video : अभ्यासाचा कंटाळा आणि डोंगरावरची शाळा; सखी गोखले सांगतेय मजेदार किस्सा
3 ट्रोलरच्या कमेंटवर भडकली अभिनेत्री, इन्स्टाग्रामला केली ही विनंती
Just Now!
X