News Flash

“स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..”; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत

पुन्हा अभिनयाकडे वळण्याचे संकेत दिले

अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या लग्नाला जवळपास ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांना ‘वीर’ नावाचा मुलगा आहे. सध्या अमृता आपल्या मुलासोबत वेळ घालवतेय. अमृताने मदर्स डेच्या निमित्ताने तिच्या मातृत्वाच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

ईटी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने मातृत्वाचा अनुभव मांडला आहे. ती म्हणाली, ” हे खूप खास वाटतं. मागच्या वर्षी मदर्स डेला माझं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं आणि मी गरोदर होते. माझं पोट बाहेर आलं होतं. पण हे क्षण खास आहेत. आता तो माझ्या कुशीत आहे. याहून छान काय असू शकतं” असं ती म्हणाली.

पुढे स्तनपानाच्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता म्हणाली, ” सगळ्यांसमोर स्तनपान करण्याला आपल्याकडे आजही विरोध असल्याचं किवा विचित्र नजरेने पाहिलं जात असल्याचं जाणून मी निराश झाले. नशीबाने मी ज्या कुटुंबात आहे तिथे या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आम्हाला वाटतं स्तनपान एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या सासरकडेचे खास करून माझ्य सासूला याचं पूर्ण श्रेय जातं. मी माझ्या मुलाला स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत नेण्याची गरज नाही असं त्या ठासून सांगतात. त्याऐवजी प्रत्येकासारख्याच मी सहज वागावं असं त्या म्हणतात. हे कौतुकास्पद आहे. मला आनंद आहे की अनमोलने तो फोटो शेअर केला. त्याने तो मुद्दाम पोस्ट केला नाही. आमच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी त्याने तो शेअर केला. जर स्तनपान ही गोष्टी अगदी सामान्य केली तर खूप बरं होईल. ” असं अमृता म्हणाली.

amruta rao (photo-instagram@rjanmol27)

आई होण्याच्या अनुभवाविषयी सांगताना अमृता म्हणाली, “प्रत्येक्ष क्षण काहीना काही शिकण्यासारखा आहे. हे खूप थकवणारं आहे मात्र तितकच समाधानकारक आहे.

पहा फोटो: “तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही” : मराठी कलाकारांकडून मातृदिनाच्या शुभेच्छा

पुन्हा अभिनयाकडे वळणार का? यावर उत्तर देताना अमृता म्हणाली, ” गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माझ्याकडे काही ऑफर आल्या होत्या. मात्र तेव्हा मी गरोदर असल्याने मला शक्य नव्हतं. सध्या मी काही स्क्रिप्ट वाचल्या आहेत. त्यातील चांगल्या मी बाजूला ठेवल्या आहे. लवकरच काहीतरी सुरू करेन. सध्या महामारीमुळे सगळेच हादरले आहेत. अपेक्षा आहे येत्या जुलै-ऑगस्टमध्ये काही सुरू करता येईल” असं म्हणत तिने अभिनयाकडे पुन्हा वळण्याचे संकेत दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 2:58 pm

Web Title: amrita rao on mothers day said breastfeeding is still taboo and its disappointing kpw 89
Next Stories
1 “आईचं नावदेखील गौरी आहे म्हणूनच…”, अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणाली…
2 छोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा
3 “श्वेता मुलाला एकटं टाकून आफ्रिकेला गेली”, अभिनवच्या आरोपांवर श्वेता तिवारी संतापली
Just Now!
X