News Flash

..म्हणून साराला मुलांपासून दूर ठेवण्याचा अमृता करतेय प्रयत्न

दूर राहण्याची ताकीद अमृताने तिला दिली.

अमृता सिंग, सारा अली खान

सध्याच्या घडीला बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलंच माध्यमांचं अधिक लक्ष वेधत आहेत. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या फोटोग्राफर्सची आवडती स्टार किड झाली आहे. ती जिथे जाईल तिथे फोटोग्राफर्स तिची छबी टिपण्यासाठी पोहचतात. जीम, सलॉन म्हणू नका की कॅफे प्रत्येक ठिकाणी तिचा मागोवा घेतला जातोय. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. पण, ती सर्वांच्या चर्चेचा विषय होण्यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे.

वाचा : अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमा करण्यास नागराज मंजुळे सज्ज?

‘मिर्झिया’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याच्यासोबत ती अनेकदा दिसल्याने या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरु झाली. पण, आपल्या मुलीचं नाव तिच्या मित्रांसोबत जोडलं गेलेलं अमृताला काही आवडलं नाही. डेक्कन क्रोनिकल्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमृताने साराला तिच्या मित्रांपासून दूर राहायला सांगितले आहे. तसेच, तिच्या भावी सहकलाकार अभिनेत्यांसोबतही बाहेर जाण्यापासून रोखले आहे. साराने कोणत्याही वादात अडकू नये एवढीच अमृताची यामागची इच्छा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेकदा सेलिब्रिटी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत येतात. तरुण कलाकार तर बऱ्याचदा त्यांच्या प्रेमप्रकरणामुळेच अधिक चर्चेत राहतात. त्यामुळे प्रेमसंबंधाच्या वृत्तापासून दूर राहण्याची ताकीद अमृताने तिला दिली.

वाचा : सिनेनॉलेज ‘जख्म’मध्ये अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?

बहुधा याच कारणामुळे सैफही साराच्या बॉलिवूड पदार्पणासाठी घाबरत होता. मात्र, त्यावेळी अमृताने त्याला खडसावत तिच्यापासून दूर राहण्यास सांगितलेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:40 pm

Web Title: amrita singh wants sara ali khan to stay away from her male friends
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमा करण्यास नागराज मंजुळे सज्ज?
2 सिनेनॉलेज : ‘जख्म’मध्ये अजय देवगणच्या वडिलांची भूमिका कोणत्या सुपरस्टारने साकारलेली?
3 माझ्या काकांमुळेच सिनेसृष्टीत टिकलो- इमरान हाश्मी
Just Now!
X