29 May 2020

News Flash

Sweety Satarkar Trailer : शेखरला इम्प्रेस करण्यासाठी स्वीटीचा प्रेमाचा जुगाड

संग्राम समेळ लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे संग्राम समेळ. ‘ललित २०५’, ‘विकी वेलिंगकर’ या मालिका आणि चित्रपटामध्ये झळकल्यानंतर संग्राम लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वीटी सातारकर असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे धमाकेदार असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

‘अस्मिता’, ‘तुमचं आमचं सेम’ या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमृता देशमुख पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून अमृताने तिच्या अभिनयाची वेगळी बाजू दाखविली असून या चित्रपटामध्ये अमृता आणि संग्रामची उत्तम केमिस्टी दिसून येत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये स्वीटी शेखरच्या प्रेमात पडते. त्यामुळे त्याला इम्प्रेस करण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करते. अगदी साडी नेसण्यापासून ते त्याला स्वत:च्या हाताने पदार्थ तयार करुन खाऊ घालण्यापर्यंत सारे प्रयत्न ती करते. मात्र तरीदेखील शेखर तिच्याकडे प्रेमभावनेने पाहत नाही. परंतु तिचे प्रयत्न सुरुच असतात. यामध्येच शेखरची एक मैत्री त्याला परत भेटते. मात्र आता पुढे काय होणार याचा उलगडा चित्रपट पाहिल्यानंतरच होणार आहे.

वाचा : सनी लिओनी आली तर ट्रम्प यांच्यासाठी १ कोटी लोक येतील – राम गोपाल वर्मा

दरम्यान, या चित्रपटामध्ये खटकेबाज संवाद असून कलाकारांचा अभिनयही उत्तम असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून निर्मिती मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी केली आहे. तर चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 2:28 pm

Web Title: amruta deshmukh sangram samel upcoming movie sweety satarkar trailer out ssj 93
Next Stories
1 Video : ‘चंदू, मी आलोय’; बिग बींनी मराठीत दिली साद
2 सनी लिओनी आली तर ट्रम्प यांच्यासाठी १ कोटी लोक येतील – राम गोपाल वर्मा
3 कबीर बेदींनी खरंच सनी लिओनीचा नंबर मागितला होता? जाणून घ्या खरं कारण
Just Now!
X