News Flash

अमृता फडणवीस यांचं करोना योद्धांसाठी नवीन गाणं, ‘तू मंदिर तू शिवाला’

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी हे गाणं समर्पित केलं आहे. 

अमृता फडणवीस

करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या योद्धांचे आभार मानले आहेत. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी हा त्यांचा यामागे उद्देश आहे.

अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेतात. याआधी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा करोनावर गाणी प्रदर्शित केली आहेत. आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी हे गाणं समर्पित केलं आहे.

करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं शुक्रवारी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असला, तरी केंद्रानं त्यापूर्वीच देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासंदर्भातील निर्णयाला परवानगी दिली. शुक्रवारी पहिली श्रमिक रेल्वे कामगारांना घेऊन धावली. सरकारच्या निर्णयामुळे अडकलेल्यांना दिलासा मिळाला. दुसरीकडं देशभरात अनेक ठिकाणी जिल्हे रेड झोनमध्ये असल्यानं केंद्रानं लॉकडाउन वाढवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 5:53 pm

Web Title: amruta fadnavis heartfelt tribute to corona warriors through new song ssv 92
Next Stories
1 ‘बागी चित्रपटांनी मला लोकप्रिय केले’; अभिनेत्रीने मानले टायगरचे आभार
2 मोबाइलचा अतिवापर पडला महागात, ‘कोमोलिका’ला झाला ‘हा’ आजार
3 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज रवी जाधव सांगणार ‘न्यूड चित्रपटाचा जन्म आणि प्रवास’
Just Now!
X