01 March 2021

News Flash

डाव मांडते भीती…. अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं

पाहा व्हिडीओ

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या ‘डाव’ या चित्रपटात अंधार हे गाणं आहे. डाव हा सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचा सिनेमा आहे. अंधार हे गाणं लेखक मंदार चोळकर यांनी लिहिलं असून संगीत जीत गांगुली यांनी दिलं आहे. डाव या सिनेमाचं दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ

अभिनेता गुलश देवैया डाव या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. सागरिका घाटगेचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. या अगोदर सागरिकाने “प्रेमाची गोष्ट’ या मराठी सिनेमात अतुल कुलकर्णीसोबत काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:09 pm

Web Title: amruta fadnavis new song andhaar daav amruta fadnavis jeet gannguli gulshan devaiah sagarika ghatge nck 90
Next Stories
1 कल्कीच्या चिमुकलीनेही केला नववर्षाचा संकल्प
2 ‘बॉब बिस्वास’साठी अभिषेकने वाढवलं १२ किलो वजन?
3 ‘मी न्यूड फोटोशूट केलं आहे’, वनिताने सांगताच आई म्हणाली…
Just Now!
X