02 March 2021

News Flash

Video : ‘तेरी बन जाऊंगी’ अल्बममध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज

या टीझर व्हिडीओला युट्यूबवर ५० हजारांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत.

अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचं गाण्याचं प्रेम सर्वश्रृत आहेच. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गाणं गायल्यानंतर आता त्यांचा आणखी एक गाण्याचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘तेरी बन जाऊंगी’ असं या गाण्याचं नाव असून टी सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

या टीझर व्हिडीओला युट्यूबवर ५० हजारांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. हे गाणं ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. यापूर्वी त्यांनी बिग बींसोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं. त्याशिवाय मुंबई-गोवा बोट उद्घाटनावेळी त्यांनी काढलेला सेल्फीही चर्चेचा विषय बनला होता.

गाण्यांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या फडणवीस यांच्या डान्सचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे त्या व्हिडिओला नेटीझन्सकडून प्रचंड लाइक्सही मिळाले होते. एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील ‘मै दिवानी, मै मस्तानी’ या गाण्यावर डान्स करताना अमृता फडणवीस या व्हिडिओत दिसल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:48 pm

Web Title: amruta fadnavis teri ban jaungi song teaser out now watch video ssv 92
Next Stories
1 ‘मनसे’समोर अक्षय कुमारची माघार
2 पुन्हा एकदा शेफ पराग कान्हेरे प्रेक्षकांच्या भेटीला
3 सिद्धार्थ मल्होत्राची त्या तिघींना डेट करण्याची इच्छा
Just Now!
X