News Flash

…म्हणून पॅरिसच्या रस्त्यावर झोपली अमृता खानविलकर

सध्या अमृताचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

उत्तम नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पहायला मिळते. ती तिच्या रोजच्या जीवनातील काही घडामोडी किंवा तिच्या आगामी प्रजोक्ट विषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देताना दिसते. नुकताच अमृता कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी युरोपला फिरायला गेल्याचे दिसत आहे.

अमृताने युरोप ट्रीपचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या ट्रीपमध्ये अमृता पॅरिसचा आयफेल टॉवर पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा अमृताची आई देखील तिच्यासोबत असल्याचे फोटोंवरुन दिसत आहे. दरम्यान तिने इतर पर्यटकांप्रमाणे आयफेल टॉवर समोर फोटो काढला आहे. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते अमृताने आईचा फोटो काढताना. आई आणि टॉवरचा अँगल फोटोमध्ये घेण्यासाठी अमृता अक्षरशः पॅरिसच्या रस्त्यावर झोपली आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरचे नाव घेतले जाते. मराठीमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर तेवढय़ावर समाधान न मानता अमृताने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. ‘राजी’, ‘मलंग’ आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली. त्यानंतर तिने रिअ‍ॅलिटी शो आणि वेबसीरीजसारख्या आधुनिक माध्यमांमध्येही स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून लोकप्रिय होण्याची किमया साधली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 11:35 am

Web Title: amruta khanvikar lai down on paris road avb 95
Next Stories
1 काजोलने नंबर दिला पण…
2 सलमानला ‘लवयात्री’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
3 संजय लीला भन्साळी चित्रपट बनवत असणाऱ्या गंगुबाई आहेत तरी कोण?
Just Now!
X