News Flash

अमृता आणि हिमांशुच्या नात्याचे ‘हे’ आहे सिक्रेट!

२०१४ मध्ये अमृताने हिंदी अभिनेता हिमांशुसोबत लग्न केलं.

अमृता आणि हिमांशुच्या नात्याचे ‘हे’ आहे सिक्रेट!

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरचा स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अमृताही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेक वेळा ती तिच्या आयुष्यातील लहान-सहान क्षणही चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच अमृताने तिच्या लग्नाचा चौथा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी तिने तिच्या आणि हिमांशूच्या नात्याचं सिक्रेट शेअर केलं.

अमृता आणि हिंदी अभिनेता हिमांशु मल्होत्रा या हिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ‘नच बलिये’ गाजवणा-या या जोडीने २४ जानेवारी २०१४ ला सात जन्मांची वचनं घेतली. तेव्हापासून ही जोडी या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सुखी संसाराचे गुपित सोशल नेटवर्किंग साइटवर उघड केलं आहे.

हिमांशु आणि अमृताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये दोघांनी एकमेकांच्या अनेक मजेशीर आठवणी शेअर केल्या. तब्बल १५ वर्ष एकत्र असलेली ही जोडी आजही नव्याने प्रेमात पडल्यासारखी भासते.

‘आजवर माझ्या अनेक चुका हिमांशूने माफ केल्या आहेत. मला सांभाळून घेतलं आहे. तो एक चांगला नवराच नाही तर एक चांगला मार्गदर्शकही आहे. माझ्या करिअरमध्येही त्याचा मोलाचा वाटा आहे. त्याने अनेक वेळा मला चांगले सल्ले दिले. माझ्या फायद्यासाठी जे जे होतं ते त्याने मला वेळोवेळी सांगितलं’, असं अमृता म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘हिमांशूच्या याच समजूतदार स्वभावामुळे आज आमचं नातं टिकून आहे. आमच्या नात्याचं हेच गुपित आहे’.
दरम्यान, हिमांशुनेही अमृताच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. १५ वर्षांपूर्वी एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये या दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून एकमेकांना डेट करणाऱ्या या जोडीने १०१४ साली लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 5:43 pm

Web Title: amruta khanvilkar and himanshu malhotra marriage anniversary news
Next Stories
1 मराठी चित्रपटसृष्टीत झालेला बदल
2 महाअंतिम सोहळ्यासाठी ‘छोटे सूरवीर’ सज्ज
3 Video : कबड्डीवर आधारित ‘सूर सपाटा’चा वेगवान टीझर प्रदर्शित
Just Now!
X