19 September 2020

News Flash

चाहत्यांसोबत साजरा झाला अमृताचा वाढदिवस

अमृताला 'डेमेज्ड' या वेबसिरीजमुळे बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली आहे.

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी यंदाचं वर्ष खूप खास ठरत आहे. अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून राझी आणि सत्यमेव जयते हे तिचे चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. विशेष म्हणजे तिच्या या यशस्वी वाटचालीचं श्रेय तिने चाहत्यांनादेखील दिलं असून यावर्षी तिने चाहत्यांसोबत वाढदिवस सेलिब्रेट करत त्यांचे आभार मानले आहेत.

‘डेमेज्ड’ या वेबसिरीजमुळे बॉलिवूडमध्ये नवी ओळख निर्माण करणाऱ्या अमृताने नुकताच सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला. या पार्टीमध्ये पाहुणे म्हणून तिचे चाहते उपस्थित होते. इतकेच नाही तर या पार्टीत प्रसारवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमांना मोठ्या प्रमाणात महत्व देण्यात आले होते. चाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँण्ड ग्रीटसाठी खास वेळ काढला.
काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर घेण्यात आलेल्या, अमृताच्या चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित ‘#अल्टिमेटफेनऑफअमृता’ या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना या पार्टीत बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, या विजेत्यांची निवड खास अमृतानेच केली होती. ‘मी जे काही आहे, ते केवळ माझ्या चाहत्यांमुळेच आहे. त्यांच्या अमाप प्रेमामुळे मी इथपर्यत पोहोचले आहे, या शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले. तसेच यापुढेदेखील अशीच साथ द्या, अशी विनंतीदेखील तिने या सर्वांना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:22 pm

Web Title: amruta khanvilkar birthday celebration
Next Stories
1 घटस्फोटानंतर वर्षभराच्या आतच ‘रोडिज’ फेम रघु चढणार बोहल्यावर
2 छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध
3 Video : पुन्हा एकदा रोमॅण्टिक होणार ‘किंग खान’
Just Now!
X