News Flash

अमृताने केला विशेष मुलांसोबत ‘ख्रिसमस’ साजरा

'ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहेत. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे,' अशी भावना तिने व्यक्ती

अमृता खानविलकर

सर्वत्र ख्रिसमसचा जल्लोष आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली अमृता खानविलकर हिनेदेखील वेळात वेळ काढत लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला. ‘सुपर डान्सर महाराष्ट्राचा’ या रिअॅलिटी शॉच्या मुलांची तर ती लाडकी ‘अम्मू दीदी’ झाली आहे. अश्या या सर्व बच्चेकंपनीच्या लाडक्या अम्मू दीदीने यंदाचा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला.

ठाणे येथील जागृती पालक संस्थेच्या गतिमंद मुलांसोबत तिने ख्रिसमस साजरा केला. नाताळ सणाच्या निमित्ताने अमृताने त्यांच्यासाठी खास भेटवस्तूदेखील आणल्या होत्या. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटण्यासाठी तिने त्यांच्यासोबत मज्जा मस्ती करत, काही खेळदेखील खेळले.

संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. ‘मी दरवर्षी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमधील लहान मुलांना जाऊन भेटते. त्यांचा सहवास मला आवडतो. ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहेत. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे,’ अशी भावना तिने व्यक्ती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 5:35 pm

Web Title: amruta khanvilkar celebrates christmas with special children
Next Stories
1 ‘तख्त’मध्ये रणवीर, विकी साकारणार या ऐतिहासिक भूमिका ?
2 अमोल कोल्हेच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण; वडिलांसोबत साकारतेय भूमिका
3 आमिरसोबतच्या नात्याबद्दल फातिमा म्हणते, कुछ तो लोग कहेंगे
Just Now!
X