13 August 2020

News Flash

‘राजी’, ‘सत्यमेव जयते’नंतर ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर

बॉलिवूडमध्ये अमृताचं नाणं खणखणीत वाजू लागलं आहे.

अमृता खानविलकर

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत आहे. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे. कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. ‘राजी’ आणि ‘सत्यमेव जयते’नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही.

मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आता ‘मलंग’मध्ये ती नेमकी कोणती भूमिका साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 3:20 pm

Web Title: amruta khanvilkar in another hindi movie after raazi and satyamev jayte ssv 92
Next Stories
1 ‘केबीसी’त बच्चन समोर असतात पण ऑटोग्राफ देतात का? जाणून घ्या शो बद्दल काही गोष्टी
2 ..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो
3 नेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना
Just Now!
X