18 July 2019

News Flash

अमृता खानविलकरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

अमृताने स्वत: ही माहिती दिली आहे

अमृता खानविलकर

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाची चर्चा सुरु आहे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताचा वावर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून ट्विटर, इन्स्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांमध्ये तिचा दबदबा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अमृताचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं असून अमृताने स्वत: ही माहिती दिली आहे.

“माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं असून सध्या मी फोनमध्ये अॅक्टीव्ह असलेल्या इन्स्टाच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत आहे. अज्ञात व्यक्तीने माझं इन्स्टा हॅक केलं असून जर या अकाऊंटवरुन एखादा फोटो, व्हिडिओ किंवा कोणताही मेसेज आला तर तो, मी किंवा माझ्या टीममधील कोणत्याही व्यक्तीने केलेला नसेल. ज्या अज्ञात व्यक्तीने माझं इन्स्टा हॅक केलं आहे, त्याने माझा मेल आयडीदेखील हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे”, असा मेसेज करुन अमृताने चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

दरम्यान, अमृताच्या लोकप्रियतेमुळेच तिचं खातं हॅक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अमृताचा हिंदी चित्रपटसृष्टीतील वावर वाढला असून आलिया भट्टच्या राझी चित्रपटात अमृता झळकली होती.

 

 

First Published on February 22, 2019 12:30 pm

Web Title: amruta khanvilkar instagram account has been hacked