30 September 2020

News Flash

अमृता ‘खतरों के खिलाडी’मधून झाली बाद; या अभिनेत्रीनं मारली बाजी

'त्या' जिवघेण्या टास्कमुळे अमृता झाली शोमधून बाद

‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अॅडव्हेंचर शो आहे. हा रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. या शोचे यंदाचे पर्व विशेष चर्चेत होते ते मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरमुळे. मात्र अमृताने ‘खतरों के खिलाडी’ला आता बाय बाय केलं आहे.

‘खतरों के खिलाडी’ या शोचे यंदा १०वे पर्व सुरु आहे. या पर्वात करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, करिश्मा तन्ना, भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी, अशा अनेक कलाकारांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. मात्र या सर्वांच्या तुलनेत अदा खान आणि अमृता खानविलकर यांचे गुण सर्वात कमी होते. परिणामी दोघांमध्ये एक टायब्रेकर राऊंड खेळला गेला.

या टायब्रेकर राऊंडमध्ये मगरीच्या पिल्लाला उचलून एका पेटीत ठेवायचे होते. या टास्कमध्ये अदाने बाजी मारली. तिने अमृतापेक्षा अधिक गुण कमावले. परिणामी शोच्या नियमानुसार अमृता ‘खतरों के खिलाडी’मधून बाद झाली.

या टीव्ही शोचा होस्ट रोहित शेट्टी याने मात्र अमृताची प्रचंड स्तुती केली. “अमृता एक उत्तम स्पर्धक आहे. हा शो जिकण्यासाठी तिने अफाट मेहनत केली. मात्र तिच्या नशिबाने तिला दगा दिला. त्यामुळे ती ‘खतरों के खिलाडी’मधून बाहेर जात आहे.” असं रोहित अमृताला निरोप देताना म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 12:51 pm

Web Title: amruta khanvilkar khatron ke khiladi season 10 adaa khan mppg 94
Next Stories
1 करोनाशी लढण्यासाठी गायकाने मोडलं आपलं सेव्हिंग
2 करोना म्हणजे जैविक युद्धच; कंगनाचा हल्लाबोल
3 ‘तुम्ही संसदेत पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण…’ अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X