News Flash

अमृताच्या ‘वेल डन बेबी’चा ट्रेलर प्रदर्शित

Well Done Baby म्हणत गुढीपाडव्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार अमृता, पुष्कर आणि वंदना गुप्ते

अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग मुख्य भूमिकेत असणारा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘वेल डन बेबी.’ नुकताच या चित्रपटात ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘वेल डन बेबी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आदित्य आणि मीरा (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते. आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे.

प्रियंका तनवर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली ड्रामामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यासारखे लोकप्रिय मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. वेल डन बेबी प्रदर्शित होत असल्याची नुकतीच झालेली घोषणा आणि त्यापाठोपाठ आलेला ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. भारतातील प्राइम सदस्यांना ९ एप्रिल २०२१ पासून हा चित्रपट पाहाता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 1:07 pm

Web Title: amruta khanvilkar pushkar jog well done baby movie trailer release avb 95
Next Stories
1 “मला न विचारताच डॉक्टरांनी ब्रेस्ट साइज वाढवली”; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
2 ‘या’ दिवशी करीना सांगणार तैमूरच्या धाकट्या भावाचं नाव?
3 गर्भपातामुळे पत्नी घेत होती गोळ्या; अटकेनंतर एजाज खानचा खुलासा
Just Now!
X