News Flash

अमृताचे हटके बर्थडे सेलिब्रेशन..

ग्लॅमडॉलने एक नवा पायंडा पाडला आहे.

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ग्लॅमडॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यंदाचा अमृताचा वाढदिवस काहीसा खास होता. कोणतीही मोठी पार्टी, कलाकारांची गर्दी नसूनही अमृताचा वाढदिवस खास होता. एका ‘एनजीओ’सोबत अमृताने तिच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतचा एक फोटोही पोस्ट केला. बर्थडे सेलिब्रेशनच्या निमित्ताने या ‘एनजीओ’तील लहानग्यांची भेट घेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिली.

अमृताच्या वाढदिवसा निमित्ताने तिला विविध कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. वेगळ्याच प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करत या ग्लॅमडॉलने एक नवा पायंडाच पाडला आहे. मूळची पुण्याच्या असलेल्या अमृताच्या कारकिर्दीला सुरूवात ‘ झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या रिएलिटी शोपासून झाली. अमृताची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या २००४ मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या टॅलेंट हंट शोमधून सुरू झाली होती. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील ‘अदा’ या मालिकेत भूमिका मिळाली.

अमृताने छोट्या पडद्यावर जम बसवत मोठ्या पडद्यावरही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमृताने झी म्युझिक वाहिनीवरील ‘बॉलिवूड टुनाइट’ या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून तिने खूपच लोकप्रियता मिळवली. अमृताने ‘गोलमाल’, ‘साडे माडे तीन’, ‘हॅटट्रिक’, ‘काँट्रॅक्ट’, ‘नटरंग’, ‘झकास’, ‘धूसर’, ‘सतरंगी रे’, ‘आयना का बायना’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. अभिनयासोबतच ती नृत्यातही पारंगत आहे. अमृताने पती हिंमाशू मल्होत्राच्या जोडीने प्रसिध्द डान्स रिएलिटी शो ‘नच बलिये’चं टायटल जिंकले होते. मराठी डान्स रिएलिटी शो ‘एकापेक्षा एक’च्या अंतिम स्पर्धकापैकी ती एक होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:53 pm

Web Title: amruta khanvilkars birthday celebration
Next Stories
1 १०० प्रतिभावान महिलांच्या यादीत आता सनी लिओनी
2 सेलिब्रिटींनाही पडली ‘डिअर जिंदगी’ची भुरळ
3 अर्जुनसोबतच्या नात्यावर अखेर मलायका बोलली..
Just Now!
X