25 February 2021

News Flash

अमृता पाहतेय ‘या’ चित्रपटाची आतुरतेने वाट!

त्यामुळे २०१८ हे वर्ष अमृतासाठी खूपच यशदायी आहे असं म्हणायला हरकत नाही.

आपल्या अभिनयामुळे आणि उत्कृष्ट अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अमृता खानविलकर सध्या बॉलिवूडच्या वाऱ्या करताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतर आता अमृताची वाटचाल हिंदी चित्रपटांकडे झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजीमध्ये अमृताने उत्तम भूमिका केली असून या चित्रपटानंतर यशानंतर अमृताच्या पदरात आणखी नवे हिंदी चित्रपट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष अमृतासाठी खूपच यशदायी आहे असं म्हणायला हरकत नाही.

समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत ‘राजी’ या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन उडी मारली आहे. तसेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजने नुकताच १० मिलीअन व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे, त्यामुळे सध्या ही गुणी अभिनेत्री यशाच्या शिखरावर असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, ‘राजी’मधील तिच्या उर्दू लहेजाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच तिचा आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.या प्रदर्शनावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.  ‘सत्यमेव जयते’ मध्ये  महत्वपूर्ण भूमिका पार पाडणारी अमृता या चित्रपटासाठी उत्सुक असून हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो असं तिला झालं आहे, असं तिने यावेळी सांगितलं.

‘राझी’ मधील शांत आणि सुस्वभावी अशी ‘मुनिरा’ आणि ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजमधील अंगावर शहारा आणणारी सीरिअल किलर ‘लोव्हीना’ साकारल्यानंतर अमृता आता मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या ‘सरिता’च्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याकडे अमृताचे डोळे लागले असून ती यासाठी उत्सुक असल्याचं तिने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:33 pm

Web Title: amruta khanvilkars upcoming bollywood film satyamev jayates trailer launch
Next Stories
1 ‘हा’ अभिनेता साकारणार सनीच्या पतीची भूमिका
2 ..म्हणून मामी-जयडीने ‘लागिर झालं जी’ ला ठोकला राम-राम!
3 ‘धडक’ थडकलं; पण…
Just Now!
X