News Flash

अमृता सुभाषने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला अनुरागला पाठिंबा, म्हणाली…

यापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूने देखील अनुरागला पाठिंबा दिला होता.

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी अनुरागला पाठिंबा दिला तर काहींना त्याला सुनावले. आता मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने सोशल मीडियावर पोस्ट करत अनुरागला पाठिंबा दिला आहे.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मी आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या व्यक्तींपैकी तू एक आहेस. तू सेटवर नेहमी माझा आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर केला आहेस. मी हे शब्दात कधीच बोललो नाही कारण आपल्या नात्यात त्याची गरज नव्हती. पण आज मी तू मला दिलेल्या आदराबद्दल धन्यावाद बोलेन’ असे म्हटले होते.

अमृतापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला होता. ‘माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून (चित्रपटातून) स्पष्ट होणार आहे’, असे तापसीने पोस्टमध्ये म्हटले होते.

काय म्हणाली पायल?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असे ट्विट पायलने केले.

अनुरागने फेटाळले पायल घोषचे आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 9:04 am

Web Title: amruta subhas supoort anurag kashyap avb 95
Next Stories
1 मिशी काढल्याने तृतीयपंथ्याशी तुलना करणाऱ्याला संतोष जुवेकरचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला “मित्रा जे…”
2 Birthday Special : सैफ आधी ‘या’ खानवर करिना होती फिदा
3 कृषी विधेयक: कंगनाकडून विरोध करणाऱ्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख, म्हणाली…
Just Now!
X