News Flash

करोनावर मात करणाऱ्या बिग बींसाठी अमूलचं क्रिएटिव्ह पोस्टर

AB beats C; अमूलचं खास पोस्टर

अमिताभ बच्चन यांनी करोनावर मात केली असून २३ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले आहे. बिग बींनी करोनावर मात केल्यामुळे चाहत्यांसह कलाविश्वातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये ‘अमूल’ने बिग बींसाठी खास कार्टून प्रसिद्ध केलं. सध्या या कार्टुनची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अमूल बऱ्याच वेळा काही खास प्रसंगी हटके कार्टुन तयार करत असतात. यावेळीदेखील बिग बींनी करोनावर मात केल्यामुळे त्यांच्यासाठी अमूलने खास कार्टुन तयार केलं, यात त्यांनी ‘AB beats C’ असं म्हटलं आहे. यातून बिग बींनी करोनावर मात केली असं सांगण्याचा प्रयत्न अमूलने केला आहे.

दरम्यान, “अमूलने तयार केलेलं हे पोस्ट बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. धन्यवाद अमूल. तुमच्या अनोख्या आणि खास पोस्टर कॅपेनसाठी माझा विचार केला त्याबद्दल. एका साधारण व्यक्तींला तुम्ही अमूल्य केलं”, अशी पोस्ट बिग बींनी हे शेअर केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 11:15 am

Web Title: amul has sweet homecoming gift for amitabh bachchan big b feels overwhelmed ssj 93
Next Stories
1 “… त्यामुळे यात काहीतरी चुकीचं वाटतंय”; बिहारच्या पोलीस महासंचालकांचा मुंबई पोलिसांवर आरोप
2 “सुशांतने आम्हाला मोठी स्वप्न बघायला शिकवलं पण रिया आली आणि…”
3 अमूलच्या कार्टूनसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्याला बिग बींचं सडतोड उत्तर
Just Now!
X