सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचं निधन झालं आहे. तो ४३ वर्षांचा होता. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त होता. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान अमुलने ‘किंग ऑफ वकांडा’ला आपल्या अनोख्या शैलीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अमुलने पोस्ट केलेलं हे कार्टून सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

#Amul Topical: Tribute to Black Panther star, Chadwick Boseman

A post shared by Amul – The Taste of India (@amul_india) on

बॉसमन याने लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्याच्या सोबत होते. बोसमन हा कोलोन कॅन्सरने त्रस्त होता. “ते खरंच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.

चॅडविक बोसमन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होता. ‘किंग ऑफ वकांडा – ब्लॅक पँथर’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार देखील पटकावला होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चॅडविकचं निधन झालं. परिणामी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.