28 February 2021

News Flash

“इक वारि फिर से आ”; ‘अमुल’ची सुशांतला अनोखी श्रद्धांजली

अमुलने आपल्या अनोख्या शैलीत सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान अमुलने आपल्या अनोख्या शैलीत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

“इक वारि फिर से आ भी जा यारा” असं म्हणत अमुलने एक कार्टून फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सुशांतने आजवर साकारलेल्या तीन व्यक्तिरेखा कार्टून फॉर्ममध्ये दिसत आहेत. “इक वारि फिर से आ भी जा यारा” हे सुशांतच्या ‘राबता’ चित्रपटातील गाणं आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. तीन वर्षांपूर्वी हे गाणं प्रचंड चर्चेत होतं. या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील झळकली होती. अमुलने दिलेली ही अनोखी श्रद्धांजली सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 6:12 pm

Web Title: amul rip sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकरी करण जोहर आणि आलियावर संतापले; जाणून घ्या कारण काय
2 सोनी मराठी देत आहे ‘लाफ्टर स्टार’ होण्याची संधी!
3 तुला अजून खूप पुढे जायचे होते… सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्याचे ट्विट
Just Now!
X