‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन ही गर्भवती आहे. अॅमीनं ‘मदर्स डे’ दिवशी गर्भवती असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. अॅमीनं जानेवारी महिन्यात अब्जाधीश प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला.
युकेमध्ये ३१ मार्च हा दिवश ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यादिवसाचं औचित्य साधून ब्रिटीश ब्युटी अॅमीनं गर्भवती असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. ‘मला घराच्या छतावर चढून सर्वांना ओरडून ही आनंदाची गोष्ट सांगायची आहे यासाठी मदर्स डे व्यतिरिक्त दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. माझ्या बाळाला भेटण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत असं अॅमीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अॅमीनं जानेवारी महिन्यात अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला होता. जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या १६ वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही ४०० मिलिअन पाऊंड असल्याचं म्हटलं जात आहे. जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे. अॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचं नाव अनेक महिलांसोबत जोडलं गेलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 12:46 pm