20 February 2019

News Flash

‘किक २’ मध्ये जॅकलिनऐवजी अॅमी जॅक्सनची वर्णी?

अॅमी जॅक्सनचं नावही चर्चेत यायला सुरूवात झाली

अॅमी सध्या '२.०' च्या चित्रिकरणात व्यग्र आहे.

गेल्याच आठवड्यात दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने ‘किक २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमानची नायिका कोण होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ‘किक’मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसली होती, किक २ मध्येही कदाचित जॅकलिनच मुख्य अभिनेत्री म्हणून सलमानसोबत झळकेल अशा चर्चा असताना आता या शर्यतीत ब्रिटीश ब्युटी अॅमी जॅक्सनचं नावही चर्चेत यायला सुरूवात झाली आहे.

कपिल शर्माच्या नवीन शोचे नाव कळले का?

त्या गोष्टीचा अजूनही पश्चात्ताप होतो- दीपिका पदुकोण

अॅमी या चित्रपटात सलमान सोबत मुख्य भूमिकेत दिसेल अशी चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. अॅमी सध्या ‘२.०’ च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. रजनिकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. त्याचबरोबर सोहिल आणि अरबाझ खानच्या ‘फ्रिकी अली’ या चित्रपटातदेखील अॅमी दिसणार आहे. ‘किक २’ मध्ये अॅमी दिसणार की नाही याबाबत साजिदनं अजूनही खुलासा केला नाही. ‘किक’मध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या, त्यामुळे आता या चित्रपटात जॅकलिन दिसणार की तिची जागा घेण्यात अॅमी यशस्वी होणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

First Published on February 13, 2018 1:40 pm

Web Title: amy jackson has been roped in to play the lead in kick 2