05 March 2021

News Flash

सी फूड खाणं सोनूला पडलं महागात

त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना चाहत्यांनी केली आहे.

एका कार्यक्रमादरम्यानं त्यानं सीफूड खाल्लं होतं. मात्र हे खाणं त्याला महागात पडलं.

अभिनेता सोनू निगमला सी फूड खाणं महागात पडलं आहे. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं सोनू रुग्णालयात भरती होता. सोनूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. तसेच काही पदार्थ खाताना अवश्य काळजी घ्या असा सल्लाही सोनूनं चाहत्यांना दिला आहे.

‘दोन दिवसांपूर्वीचं रुग्णालयात भरती होतो. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं अशी परिस्थिती ओढावली आहे. अॅलर्जीमुळे मला थेट आयसीयूमध्ये मला दाखल व्हावे लागले. नानावटी रुग्णालयाच्या परिसरात मी असल्याने मी तिथे लगेच दाखल झालो. रुग्णालय जवळ नसते तर हे प्रकरण माझ्या जीवावर बेतले असते त्यामुळे तुम्ही देखील अॅलर्जी असल्यास कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दाखवू नका.’ असं सोनूनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका कार्यक्रमादरम्यानं त्यानं सीफूड खाल्लं होतं. मात्र हे खाणं त्याला महागात पडलं. आता आपली तब्येत सुधारत आहे अशी माहिती सोनूनं दिली. त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना चाहत्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 5:37 pm

Web Title: an allergy put sonu nigam in hospital
Next Stories
1 Video : लवकरच प्रदर्शित होणार ‘डोक्याला शॉट’
2 अखेर प्रियांकानेच उलगडलं त्या फोटोग्राफर्सचं गुपित
3 रितेशने शोधला अजयचा कुत्रा….नेटीझन्सनी केली ‘टोटल धमाल’
Just Now!
X