04 March 2021

News Flash

‘तूझी नेहमीच आठवण येईल’, दिव्या भटनागरच्या निधनावर अभिनेत्याने केली पोस्ट

सध्या त्याची भावूक पोस्ट चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या भटनागरचे ७ डिसेंबर रोजी करोनामुळे निधन झाले. सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आता अभिनेता शोएब इब्राहिमने सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

शोएबने दिव्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘मला तुझी नेहमी आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. ‘जीत गई तो पिया मोरे’ या मालिकेत शोएब आणि दिव्याने एकत्र काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दिव्याच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर तिला न्युमोनिया झाल्याचे समोर आले. गोरेगाव येथील एसआरवी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. दिव्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी वयाच्या ३४व्या वर्षी दिव्याने अखेर श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 2:21 pm

Web Title: an emotional shoaib ibrahim shares happy pic with the late star divya bhatnagar avb 95
Next Stories
1 ‘पटकन गाडीतून उतरलो आणि..’; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शंतनूची खास पोस्ट वाचाच
2 ‘त्यावेळी केवळ शाहरुखनं केली मदत’; त्या आठवणीने जॉनी लिव्हर झाले भावूक
3 हिना खानच्या बॅकलेस फोटोशूटवर कमेंट्सचा पाऊस
Just Now!
X