अभिनेत्री अनन्या पांडेची बहिण अलाना पांडे सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. अलाना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला असून त्यावर आईने कमेंट केली आहे.

नुकताच अलानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाथटबवर बॉयफ्रेंड Ivor Mccray V सोबत बसली असल्याचे दिसतस आहे. त्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alanna Panday (@alannapanday)

अलानाच्या या पोस्टवर तिची आई डियान पांडे यांनी कमेंट केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये ‘गॉड ब्लेस’ इतकच म्हटले आहे. त्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने देखील यावर कमेंट केली आहे. तिने ‘क्यूट’ असे म्हटले आहे.

अलाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बऱ्याच वेळा बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या रिलेशनला एक वर्षे पूर्ण झाले म्हणून एक व्हिडीओ शेअर केला होता.