करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मधून अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. त्यामुळे आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनन्याच्या या पदार्पणाबरोबरच तिच्या अफेरबद्दलही चर्चा रंगताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अनन्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मोनिका जयसिंह यांचा मुलगा करण जयसिंह याला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मोनिका जयसिंह आणि चंके पांडे या दोन्ही कुटुंबाचे घरोब्याचे संबंध आहेत. यामधूनच अनन्या आणि करणची ओळख झाली आहे.अनेक वेळा अनन्या तिच्या इन्स्टाग्रामवर मित्र-मैत्रिणींचे फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये अनेक वेळा करणदेखील तिच्याबरोबर दिसत असतो. त्यामुळे करण हा अनन्याचा केवळ मित्र आहे कि त्यापलिकडेही त्यांचं नातं आहे हे आताच निश्चितपणे सांगता येणार नाही.

दरम्यान, अनन्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त असून  ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ हा चित्रपट ‘धर्मा प्रॉ़डक्शन’अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अनन्याव्यतिरिक्त तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफही स्क्रिन शेअर करणार आहे.