26 September 2020

News Flash

…म्हणून अनन्या पांडेला नाइट क्लबमध्ये नाकारला प्रवेश

अनन्या काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रपरिवारासोबत मुंबईतील एका नाइट क्लबमध्ये गेली होती

अनन्या पांडे

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेची लोकप्रियता आता हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्यादेखील वाढतांना दिसत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असलेल्या या अभिनेत्रीला मात्र मुंबईतील एका नाइट क्लबने प्रवेश देण्यास मनाई केल्याचं समोर आलं.

२० व्या वर्षी करिअरची सुरुवात करणाऱ्या अनन्या काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रपरिवारासोबत मुंबईतील एका नाइट क्लबमध्ये गेली होती. मात्र तिचं वय कमी असल्यामुळे या क्लबने तिचा प्रवेश नाकारला आणि तिला प्रेवश देण्यास मनाई केली.  नाइट क्लबमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी वयाची अट असते. २४ वर्षांवरील व्यक्ती क्लबमध्ये प्रवेश करु शकतात. मात्र अनन्याचं वय केवळ २० वर्ष आहे. त्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही.

दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटानंतर अनन्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर स्क्रीन शेअर करणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 1:49 pm

Web Title: ananya panday denied entry to a club as the actress was underage ssj 93
Next Stories
1 बॉलिवूड इंडस्ट्री सलमानची चापलूसी करण्यात व्यग्र- कंगनाच्या बहिणीचा टोला
2 ‘सूर्यवंशी’साठी अक्षयने केला जोखमीचा स्टंट
3 मुंबईतील मशिदीबाहेर चेहरा झाकून कार्तिक-साराने काढला सेल्फी
Just Now!
X