News Flash

Valentine’s Day Special: अनन्या पांडेने सांगितलं EX-Boxचं गुपित

पाहा व्हिडीओ

आज १४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन डे. व्हॅलेन्टाईन डे हा सगळ्या कपल्ससाठी खूप खास असतो. त्याच निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने एका डेटिंग अॅपसोबत टीमअप केलं आहे. त्यावेळी बोलताना अनन्याने तिच्या ब्रेकअप विषयी सांगितले. तिने सांगितले की तिच्याकडे एक एक्स-बॉक्स आहे ज्यात तिने तिच्या एक्सच्या आठवणी ठेवल्या आहेत.

“माझा सध्याचा रिलेशनशिप स्टेटस हा आम्ही फक्त चांगले मित्र आहोत ही बॉलिवूडची बोलण्याची स्टाईल आहे” असं अनन्या व्हिडीओच्या सुरूवातीला म्हणाली. तिच्या ब्रेकअप विषयी बोलताना अनन्या बोलते की, “माझ्याकडे एक एक्स-बॉक्स (ex-box)आहे. मला कार्ड जाळताना वाईट वाटतं. त्या बॉक्समध्ये चित्रपटाचे तिकीट्स आणि बरचं काही आहे. माझ्या सगळ्या आठवणी या बॉक्समध्ये आहेत.”

पुढे, ब्रेकअप झालेल्या लोकांना अनन्याने काही सल्ले दिले आहेत. “जे लोक या सगळ्या गोष्टींना विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी सल्ला देईन, हा शेवट नाही, आता एक नवीन सुरूवात करा.”

दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिका साकारणार आहे. या व्यतिरिक्त अनन्या दिग्दर्शक शकुन बत्राच्या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 5:12 pm

Web Title: ananya panday revealed that she has an ex box in which stored her memories of her past relationships dcp 98 avb 95
Next Stories
1 Video: दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?
2 प्रभास करतोय पूजा हेगडेशी फ्लर्ट, ‘राधे श्याम’चा टीझर प्रदर्शित
3 रणबीर कपूरने ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क केली अन्…
Just Now!
X