13 August 2020

News Flash

विजय देवरकोंडा पहिल्याच बॉलिवूडपटात ‘या’ स्टारकिडशी करणार रोमान्स

मार्च सुरू होणार शुटिंग

अर्जून रेड्डी, डिअर कॉम्रेड या सारख्या सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडणारा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच एका सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात विजय बॉलिवूडमधील स्टारकिड असलेल्या अनन्या पांडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडानं दिले होते. त्यानंतर आता त्यांच्या पहिल्या बॉलिवूडपटाचं शुटिंग सुरू होत आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. मात्र, पुरी जगन्नाध यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं नाव फायटर असल्याची माहिती समोर आली आहे. या सिनेमात विजय देवरकोंडाबरोबर कोणती अभिनेत्री दिसणार याविषयीची चर्चा सुरू होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.

पुरी जगन्नाध या सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडेऐवजी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसणार होती. मात्र, ऐनवेळी तिच्या ऐवजी अनन्या पांडेला या भूमिकेसाठी घेण्यात आलं. अनन्या पांडेला विजय देवरकोंडासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं, सूत्रांनी म्हटलं आहे. या सिनेमाचं शुटिंग मार्चच्या मध्यावधीनंतर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचं समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 3:09 pm

Web Title: ananya panday to star opposite vijay deverakonda in upcoming flim bmh 90
Next Stories
1 गणेश आचार्यनंतर आणखी एका बॉलिवूड कलाकारावर विनयभंगाचा गुन्हा
2 सारा-कार्तिकच्या इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; व्हिडीओ मात्र चर्चेत
3 ‘सकारात्मक राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही’; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या इरफानचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Just Now!
X