25 November 2020

News Flash

‘मै पॉर्न चाहती हूँ’, जाणून घ्या असे का म्हणाली अनन्या पांडे

अनन्याने एका शोच्या मंचावर हे म्हटले आहे

‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक झाले. आता अनन्या लवकरच ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर दिसणार आहे.

‘पती पत्नी और वो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या, कार्तिक आणि भूमि सध्याचा बहुचर्चित पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस १३मध्ये पोहोचले होते. शोचा सूत्रसंचालक सलमान खान आणि या तीन कलाकारांनी मिळून शोमध्ये धमाल केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सलमानने त्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये अनन्याने ‘मैं पॉर्न चाहती हूँ’ असे म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सलमानने अनन्या, कार्तिक आणि भूमिला कानाला मोठ्या आवाजात गाणी सुरु असलेले हेडफोन लावायला दिले होते. ते कानाला लावल्यानंतर समोरची व्यक्ती काय बोलते हे त्याच्या ओठांच्या हालचालींवरुन ओळखायचे असा टास्क होता. यावेळी अनन्याला कानाला हेडफोन लावण्यास देण्यात आले होते आणि सलमान तिला ‘बिग बॉस चाहते हैं’ असे म्हणतो. हे ओळखताना अनन्याने ‘मैं पॉर्न चाहती हूँ’ असे म्हणते. तिचे हे उत्तर ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरते. अनन्याचे उत्तर ऐकून कार्तिक ‘हा ती खूप पाहते’ असे म्हणाला आहे.

कानाला हेडफोन लावून सलमान काय बोलतो हे ओळखण्याचा अनन्याने सहा वेळा प्रयत्न केला. परंतु ती अयशस्वी ठरली. मात्र सलमानने अनन्या काय बोलते हे लगेच ओळखले.

आणखी वाचा : चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे नंतर काय होते? जाणून घ्या

‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार होती. या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला.

चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमि, अन्यना आणि कार्तिक हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 4:09 pm

Web Title: ananya pandey says mai porn chahti hu avb 95
Next Stories
1 काय आहे उत्कर्ष शिंदेच्या सुपरहिट गाण्यामागचे गुपित?
2 मोहन जोशींचा ‘रफ अँड टफ’ लूक
3 टेलर स्विफ्टने केली कमाल; मोडला मायकल जॅक्सनचा विक्रम
Just Now!
X