02 March 2021

News Flash

सनासारख्या फ्लॉप अभिनेत्रीसोबत लग्न का केलं?; अनसने ट्रोलर्सला दिलं जोरदार प्रत्युत्तर

सना खानचा पती ट्रोलर्सवर संतापला, म्हणाला, "मी अल्लाकडे..."

मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री सना खानने अभिनयसृष्टीला रामराम ठोकला अन् व्यवसायिक अनस सईदसोबत लग्न केलं. अलिकडेच तिने आपल्या हनिमुनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाहीत. परिणामी त्यांनी सनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनसने सनासारख्या फ्लॉप अभिनेत्रीसोबत लग्न का केलं? असा सवाल वारंवार ट्रोलर्स विचारत आहेत. या प्रश्नावर अखेर अनसने मौन सोडलं आहे. मी अल्लाकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. असं प्रत्युत्तर त्याने दिलं आहे.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनसने सनासोबत केलेल्या लग्नावर भाष्य केलं, तो म्हणाला, “लोक आमच्या जोडीबाबत काय म्हणतायेत यानं मला काहीही फरक पडत नाही. माझं सनावर प्रेम आहे. मी अल्लाकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अन् अल्लाने माझी इच्छा पूर्ण केली. सना खूप समजूतदार आहे. मला माझी ड्रिम पार्टनर मिळाली.”

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

यानंतर सनाने अभिनयसृष्टीला रामराम का ठोकला याबाबतही त्यानं सांगितलं. तो म्हणाला, “सनाने अभिनयसृष्टीतून निवृत्ती घेतली हे ऐकून मला देखील खूप मोठा धक्का बसला होता. कारण तिने आपल्या करिअरमध्ये कार्यरत राहावं अशी माझी इच्छा होती. किंबहूना तिची महत्वाकांक्षा पाहूनच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण तो सनाचा निर्णय होता. अन् मी तिच्या निर्णयाचा आदर करतो. तिला आपल्या कुटुंबाला अधिक वेळ द्यायचा आहे त्यामुळे तिने अभिनय करण्याचं थांबवलं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 12:59 pm

Web Title: anas saiyad getting married to sana khan wasnt an overnight decision mppg 94
Next Stories
1 रितेशच्या ४० व्या वाढदिवशी जेनेलियाने दिलं होतं हे ‘लय भारी’ गिफ्ट; फोटो पाहून फिटतील डोळ्याची पारणं
2 “…तेच खरे देशभक्त”; कंगनाने केलं नवं ट्विट
3 “कंगनाची चौकशी का नाही?”; ड्रग्ज प्रकरणावरुन सचिन सावंत यांचा NCBला सवाल
Just Now!
X