अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ चित्रपट चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ या नावाने प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. आता ‘अंधाधून’ने चीनमध्ये ३०० कोटींचा पल्ला पार करुन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये नाव नोंदवले आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरव्दारे दिलेल्या माहितीनुसार ‘अंधाधून’ने ३०३ कोटींची कमाई केली असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात तब्बल १५०.५१ कोटींची कमाई केली होती. तसेच पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती. मात्र चीनमध्ये हिच कमाई तिप्पट झाल्याची पहायला मिळली.

‘अंधाधून’ या चित्रपटात आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. तसेत हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. चाहत्यांनी हा चित्रपट अक्षरश: उचलून धरला होता. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.

‘अंधाधून’ हा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमधील तिसऱ्या क्रमांकावरील चित्रपट आहे. यापूर्वीही ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडिअम’ या चित्रपटांची चीनमध्ये चलती पाहायला मिळाली होती.