03 December 2020

News Flash

आंद्रे रसेलला वेध बॉलिवूडचे

आंद्रेने त्याच्या मनोरंजन विश्वातील करिअरचे श्रेय ड्वेन ब्रावोला दिले

वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे नेहमीच त्यांच्या मजा मस्तीच्या मूडसाठी ओळखले जातात. पार्टी करणं, मजा मस्ती करणं हा तर त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भागच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल लवकरच बॉलिवूडच्या पिचवर आपली नवी इनिंग सुरू करणार आहे.

आंद्रे रसेल लवकरच त्याचा एक आंतरराष्ट्रीय म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे. या म्युझिक व्हिडीओबरोबरच तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. याबाबत बोलताना रसेल म्हणाला की, होय, हे खरंय. मला मनोरंजन विश्वातही करिअर करायचं आहे. त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहेत. यावर्षी माझा पहिला आंतरराष्ट्रीय म्युझिक व्हिडीओ भारतात प्रदर्शित करणार आहे. त्यानंतर मी बॉलिवूड सिनेमांमध्येही अभिनय करणार आहे.

रसेलचा हा व्हिडीओ लॉस एंजलिस येथील जेमिनी म्युझिकने बनविला आहे. जेमिनीने नुकताच ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबरच्या ‘सॉरी’ या अल्बमचीही निर्मिती केली. दरम्यान, आंद्रेचा हा म्युझिक अल्बम या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. आंद्रेने त्याच्या मनोरंजन विश्वातील करिअरचे श्रेय ड्वेन ब्रावोला दिले. तो म्हणतो की, ब्रावोच्या ‘चॅम्पियन’, ‘जाग्रबोम्ब’ आणि ‘ट्रिप अभी बाकी हैं’ या अल्बममधूनच त्याला म्युझिक व्हिडीओ बनविण्याची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर बॉलिवूडपटांमध्ये अभिनय करण्याचादेखील मी विचार करत असल्याचा तो यावेळी म्हणाला. आंद्रेला त्याच्या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा किंवा दीपिका पदुकोण यांच्यापैकी एका अभिनेत्रीला घेण्याची इच्छा आहे. आता या दोघींपैकी नक्की कोण त्याच्यासोबत काम करायला तयार होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 3:24 pm

Web Title: andre russell west indies cricket star wants deepika priyanka in debut album
Next Stories
1 विराटला अनुष्का नाही तर ही अभिनेत्री वाटते ‘क्यूट’
2 कटप्पामुळे या राज्यात ‘बाहुबली २’ ला तीव्र विरोध, सिनेमा प्रदर्शित न करु देण्याची धमकी
3 अक्षयच्या ‘पॅडमॅन’मध्ये आता ‘शहेनशहा’ही
Just Now!
X