News Flash

Coronavirus : ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

दोन दिवसांपूर्वीच त्यांना करोना व्हायरसची लागण झाली होती.

अँड्र्यू जॅक

करोना व्हायरसचा आणखी एका कलाकाराला फटका बसला आहे. ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅक यांचा करोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी सर्रे या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. अँड्र्यूने ‘स्टार वॉर्स’ या गाजलेल्या चित्रपटांच्या सीरिजमध्ये जनरल इमॅटची भूमिका साकारली होती.

अँड्र्यू यांचा एजंट जिल मॅक्लोने त्यांच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ते थेम्स नदीवरील एका जुन्या हाऊसबोटमध्ये राहायचे. त्यांचं पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. ते डायलेक्ट कोचसुद्धा होते, असं जिलने सांगितलं.

अँड्र्यू यांची पत्नी ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाइनमध्ये राहत आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली, ‘अँड्र्यू जॅकला दोन दिवसांपूर्वीच करोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांना कोणत्याच वेदना नव्हत्या.’

अँड्र्यू यांनी स्टार वॉर्स : एपिसोड VIII- द लास्ट जेडीमध्ये जनरल इमॅटची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी सोलोः अ स्टार वॉर्स स्टोरी आणि स्टार वॉर्सः एपिसोड VII- द फोर्स अवेकन्समध्येही भूमिका साकारल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 10:14 am

Web Title: andrew jack who played general ematt in star wars dies of coronavirus ssv 92
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘यापुढे अपमानास्पद कमेंट केली तर…’; ऋषी कपूर ट्रोलर्सवर भडकले
2 करोनाचा ‘वंडर वुमन’ला फटका; वर्षातील सर्वात मोठा चित्रपट लांबणीवर
3 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज अभिनेता मंगेश देसाई करणार द.मा. मिरासदार यांच्या कथेचं अभिवाचन
Just Now!
X