काही महिन्यांपूर्वी कोणताही गाजावाजा न करता अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदीनं आपला विवाहसोहळा उरकला. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकेपर्यंत अनेकांना या लग्नाबद्दल खबरही नव्हती. त्यामुळे अंगद बेदी आणि नेहाचा विवाहसोहळा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. नेहा लग्नाआधीच गर्भवती असल्यानं हा विवाहसोहळा तडकाफडकी करण्याचा निर्णय घेण्यात आला हे नंतर उघड झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगदनं स्वत: सोशल मीडियावर नेहा गर्भवती असल्याची गोड बातमी दोन महिन्यांपूर्वी दिली. मात्र ही गोष्ट घरी सांगणं खूपच कठीण होतं हे अंगदनं नेहाच्याच कार्यक्रमात मान्य केलं. नेहा लग्नाआधी गर्भवती होती, त्यामुळे ही गोष्ट कुटुंबीयांना कशी सांगायची हा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला होता. कुटुंबींयाना सांगण्याची हिंमतच  होत नव्हती. मात्र पहिल्यांदा जेव्हा गोष्ट कुटुंबीयांना सांगितली तेव्हा खूप ओरडा पडला. कुटुंबीयांना ही गोष्ट पचवणं खूपच अवघड गेली, मात्र नंतर दोन्ही परिवारानं आमचं नातं मान्य केलं असा अनुभव अंगदनं नेहाच्या कार्यक्रमात सांगितला.

एका मुलाखतीत नेहानं देखील असाच काहीसा अनुभव सांगितला.  गर्भवती असल्याची गोष्ट सहाव्या महिन्यापर्यंत मी लपवून ठेवली होती. कदाचित मी गर्भवती असल्याचं समजताच मला कोणीही काम देणार नाही माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सारखी वाटायची म्हणूनच मी बातमी लपवून ठेवली होती असं तिनं कबुल केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angad bedi reveals how family react when they come to know neha was pregnant before wedding
First published on: 15-11-2018 at 13:59 IST