हॉलीवूड अभिनेत्री आणि तिचा नवरा आणि अभिनेता ब्रॅड पीट ह्या लोकप्रिय जोडीने दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. पण आता एंजेलिनाने आपला नवरा ब्रॅड याच्यावर नवे आरोप केलले आहेत आणि कोर्टासमोर नवी कागदपत्रं आणि पुरावे सादर केले आहेत. काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.

एंजेलिना जोली हिने ब्रॅडवर आता घरगुती हिंसाचाराचे नवे आरोप केल्याचं समोर येत आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाने या विषय़ीची माहिती दिली आहे. तिने काही कागदपत्रं कोर्टासमोर सादर केली आहेत. तिचं असं म्हणणं आहे की आपल्या आरोपांना पुष्टी देणारे हे पुरावे आहेत. या आधारे असंही कळत आहे की त्यांची मुलंदेखील ब्रॅडच्या विरोधात कोर्टात बोलायला तयार आहेत. युएस वीकली या मासिकाने ही माहिती दिली आहे. मिस्टर अँड मिसेस स्मिथ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी म्हणजे २००४ साली ते भेटले. त्यानंतर त्यांनी साधारण १० वर्षे एकमेकांना डेट केलं आणि २०१४ साली लग्न केलं. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि सगळी कायदेशीर लढाई लढली. त्यानंतर २०१९ साली ते कायदेशीर रित्या विभक्त झाले.

या दोघांना सहा मुलं आहेत. त्यातली बरीचशी अल्पवयीन असल्याने ती कोर्टात साक्ष देऊ शकत नाहीत. २०१६मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यावर ब्रॅडची मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी चौकशीही झाली होती.

आता एंजेलिनाने नव्याने काही आरोप केले आहेत. हा फक्त ब्रॅडला खाली खेचण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. २०१६ मध्येही तिने जे आरोप केले होते त्याची चौकशी झाली मात्र त्यासंदर्भात पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. युएस वीकली च्या म्हणण्यानुसार हा ब्रॅडला दुखावण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ती मुलांना हाताशी धरत आहे. या आधीही तिने हे प्रयत्न केले आहेत.

ब्रॅड पीट २०१९ सालच्या ‘ऍड ऍस्ट्रा’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. त्याला सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला.