News Flash

आता चौथं लग्न करायला अँजेलिना जोली सज्ज

दोघांमधील वाढती जवळीक पाहून लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार

अँजेलिना जोली

हॉलिवूडचा स्टार ब्रॅड पीटपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री अँजेलिना जोली चौथे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका ब्रिटीश व्यावसायिकासोबत लग्न करणार आहे. लाइफ अॅण्ड स्टाइल मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अँजेलिनाला ब्रॅड पिटसोबतच्या घटस्फोटाची औपचारिकता लवकरता लवकर पूर्ण करायची आहे. घटस्फोटानंतर ती फिलेन्थ्रॉपिस्टशी लग्न करणार आहे.
अँजेलिना आणि तिच्या प्रियकराची ओळख जॉर्ज क्लूनीची पत्नी अमाल क्लूनीने करुन दिली. अँजेलिना आणि तिच्या प्रियकराच्या अनेक आवडी- निवडीसारख्या आहेत. दोघांनाही राजकारणात रस असून दोघंही गरजूंना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतात. दोघांमधील वाढती जवळीक पाहून लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार असे म्हटले जात आहे.

दोघांनाही आपल्या नात्याला एक नाव द्यायचे आहे. अँजेलिनाला लवकरात लवकर लग्न करुन लंडनमध्ये आपल्या मुलांसह स्थायिक व्हायचे आहे. अँजेलिना आणि ब्रॅड पिटबद्दल बोलायचे झाले तर २०१६ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. ब्रॅड-अँजेलिना यांना मॅडॉक्स (१५), पॅक्स (१३), जाहरा (१२) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुलं आहेत. १२ वर्ष हे दोघं एकत्र होते. लॉस अँजेलिसला जाताना विमानात मद्यपानानंतर ब्रॅड आणि त्याचा मुलगा मॅडॉक्समध्ये वाद झाला होता. ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला त्रस्त झालेल्या अँजेलिनाने या घटनेनंतर थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर तिने सहा मुलांचा ताबाही स्वतःकडेच घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 5:15 pm

Web Title: angelina jolie breakup brad pitt new marriage ready
Next Stories
1 कतरिनासोबत सर्वांत मोठ्या डान्स फिल्ममध्ये झळकणार करणचा ‘स्टुडंट’
2 माझ्या प्रियकरांनीच मला कायम दगा दिला: कंगना रणौत
3 BLOG : चित्रपट क्षेत्रातील कोंबडी पुराण
Just Now!
X