News Flash

३ लग्न करुनही एकटीच पडली अँजेलिना जोली

बॉबशी लग्न मोडल्यानंतर अँजेलिना नैराश्यग्रस्त झाली होती

अँजेलिना जोली

हॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून अँजेलिना जोलीकडे पाहिले जाते. नुकताच तिचा ४३ वा वाढदिवस पार पडला. अँजेलिनाच्या सौंदर्याने तर संपूर्ण विश्व तिच्या प्रेमात आहे. तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा तिच्या चाहत्यांचा आजही अट्टाहास असतो. आज आम्ही तुम्हाला अँजेलिनाच्या आयुष्याशी निगडीत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यांबद्दल तुम्हाला फारसे माहित नसेल.

अँजेलिना लहानपणापासूनच फार हट्टी होती. लहानपणीचा तिच्यातला हा गुण मोठेपणी वाढतच गेला. अँजेलिनाने तिचं आयुष्य तिच्या पद्धतीनेच जगले. तिच्या हट्टीपणामुळे तिला अभिनयाच्या वर्गातूनही बाहेर काढण्यात आले होते. अँजेलिनाला अभिनेत्री न बनता फ्यूनरल डायरेक्टर व्हायचे होते. फ्यूनरल डायरेक्टर म्हणजे अशी व्यक्ती जी शवांची देखरेख करते.

अँजेलिनाने १९९५ मध्ये हॅकर्स सिनेमातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केले. या सिनेमात तिने हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी लीसोबत स्क्रिन शेअर केली होती. चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १९९६ मध्ये दोघांनी लग्न केले. असं म्हटलं जातं की अँजेलिनाने स्वतःच्याच लग्नात काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. या पांढऱ्या टी- शर्टवर तिने जॉनी लीचे नाव आपल्या रक्ताने लिहिले होते.

अँजेलिना आणि जॉलीचे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांच्या घटस्फोटानंतर तिने बिली बॉब थॉर्टनशी दुसरं लग्न केलं. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. बॉबशी लग्न मोडल्यानंतर अँजेलिना नैराश्यग्रस्त झाली होती. तिची तब्येत इतकी खराब झाली होती की अमली पदार्थांच्या आहारी गेली होती.

या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी २०१२ मध्ये तिने कंबोडिया येथून सात महिन्याच्या एका मुलाला दत्तक घेतले. या मुलाचे नाव तिने मडॉक्स असे ठेवले. यानंतर तिने अजून तीन मुलांना दत्तक घेतले. २०१४ मध्ये अँजेलिनाने ब्रॅड पीटशी लग्न केले. ब्रॅडपासून तिला जुळी मुलंही आहेत. आज ती एकूण सहा मुलांची आई आहे. पण या सुखी संसारालाही कोणाची तरी नजर लागली आणि २०१६ मध्ये अँजेलिना- ब्रॅडने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:53 pm

Web Title: angelina jolie life story and her three divorce
Next Stories
1 Dhadak Trailer : कुठे ‘सैराट’ अन् कुठे…., ‘धडक’च्या ट्रेलरविषयी कोण काय बोललं?
2 ‘धडक’चा ट्रेलर पाहून अशी होती अंशुलाची प्रतिक्रिया!
3 ‘या’ ठिकाणी रणबीरने केले आलिया भट्टला प्रपोज
Just Now!
X