News Flash

माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवरुन यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड होतायेत- कोयना मित्रा

तिने सायबर क्राइमकडे तक्रार केली आहे.

बॉलिवूड कलाकारांचे असंख्या चाहते असल्याचे पाहायला मिळते. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये असते. कधीकधी कलारांचे फेक अकाऊंट तयार करण्यात आले असल्याच्या घटना देखील घडतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री कोयना मित्रासोबत घडला आहे.

यूट्यूबवर कोयनाच्या नावाने एक फेक अकाऊंट बनवण्यात आले आहे. या अकाऊंटमधून अनेक पॉर्न व्हिडीओ अपलोड केले असल्याचे समोर आले आहे. कोयनाने या विरोधात सायबर क्राइमकडे तक्रार केली आहे. तसेच फेक अकाऊंट तयार करण्यात आले असल्याची माहिती कोयनाने ट्विरद्वारे दिली आहे.

कोयनाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘तुम्हाला वाटते हे फॅनक्लब आहे? जे माझ्या नावाने असे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहे. हे अकाऊंट माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा हे अकाऊंट पाहा. हा गुन्हा नाही तर काय आहे?’ असे तिने ट्विटमध्ये इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या फेक अकाऊंटचे स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले आहे.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले आहे. ‘दोन्ही अक्षेपार्ह आहे. सर्वात पहिले हे कोणतेही फॅन पेज नाहीत. कोण आहेत साहिल आणि सना खान? ते माझ्या नावाने यूट्यूब चॅनेल देखील चालवत आहेत. तसेच त्यांनी पॉर्न व्हिडीओ देखील अपलोड केले आहेत. कोणतीही कमेंट करण्यापूर्वी एकदा इन्स्टाग्रामवरील बायो वाचा’ असे तिने म्हटले आहे.

याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कोयनाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. ‘डिसेंबरपासून मला ट्विटरद्वारे अनेकांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट करण्याची विनंती केली पण मी नाही केले. पण लॉकडाउनमुळे मी गेल्या महिन्यात अकाऊंट क्रिएट करण्याचा विचार केला. कारण सध्या सर्वचजण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. जेव्हा मी अकाऊंट क्रिएट करायला गेले तेव्हा मला कळालं माझ्या नावाचे फेक अकाऊंट तिथे आहे आणि ते अकाऊंट जवळपास ३६ हजार लोक फॉलो करतात’ असे ती म्हणाली.

‘मी या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी या विरोधात योग्य ती कारवाई करावी. तसेच माझ्या नावाने कोणाची फसवणूक तर झाली नाही ना हे देखील एकदा पाहावे’ असे तिने पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:33 pm

Web Title: angry koena mitra blasts imposter on youtube for uploading porn videos under her name avb 95
Next Stories
1 Raat Akeli Hai Trailer: नवाजुद्दीन सिद्दिकी उलगडणार मर्डर मिस्ट्री
2 “रणबीर व आलियापेक्षा चांगले कालाकर शोधून दाखवा,” दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप
3 महाराष्ट्र पोलिसांना सोनू सूदकडून अनोखी भेट; गृहमंत्र्यांनी मानले आभार
Just Now!
X