News Flash

…आणि रणबीर छायाचित्रकाराचा मोबाईल घेऊन निघून गेला!

एकही शब्द न बोलता रणबीर छायाचित्रकाराचा मोबाईल घेऊन तेथून रागात निघून गेला.

कोणी सतत पाठलाग केलेला मला आवडत नाही. त्याचा मला खूप त्रास होतो, असे सांगत रणबीरने तक्रार व्यक्त केली.

अभिनेत्री कतरिना कैफने छायाचित्रकारांवर राग व्यक्त केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी रात्री अभिनेता रणबीर कपूरने एक छायाचित्रकार छायाचित्र टिपण्याचे काम करत असताना त्याला रोखले. याशिवाय, छायाचित्रकाराचा मोबाईल देखील जप्त केला.

फ्रीलांस फोटोग्राफर वरिन्दर चावला यांच्या टीम मधील एक छायाचित्रकार मुंबईतील वांद्रे येथे कारमधून जाणाऱया रणबीरचे छायाचित्रे टीपत असताना हा प्रकार घडला. छायाचित्रकाराने कॅमेरातून छायाचित्रे काढण्यास सुरूवात केल्यानंतर फ्ल्रॅशमुळे वैतागलेल्या रणबीरने आपली कार पुढे जाऊन थांबवली आणि संतापलेल्या मनस्थितीतच तो बाहेर आला. थेट छायाचित्रकाराच्या दिशेने जाऊन रणबीरने छायाचित्रकाराजवळ मोबाईलची मागणी केली. छायाचित्रकारने आपला मोबाईल रणबीरकडे सुपूर्द केला, पण त्यापुढे एकही शब्द न बोलता रणबीर छायाचित्रकाराचा मोबाईल घेऊन तेथून रागात निघून गेला.

संबंधित छायाचित्रकाराने घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या वरिष्ठांना म्हणजेच वरिन्दर चावला यांना सांगितला. त्यानंतर चावला यांनी छायाचित्रकाराच्या मोबाईलवर फोनकरून रणबीरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण रणबीरने फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर चावला यांनी रणबीरच्या मोबाईलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास अपयश आले. शेवटी रणबीरच्या मोबाईलवर एका मेसेजद्वारे चावला यांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर रणबीरचा रात्री दीडच्या सुमारास समोरून फोन आला. कोणी सतत पाठलाग केलेला मला आवडत नाही. त्याचा मला खूप त्रास होतो, असे सांगत रणबीरने चावला यांच्याकडे तक्रार व्यक्त केली. त्यावर चावला यांनी छायाचित्र टिपणे हे छायाचित्रकाराचे काम असून तो छायाचित्रकार फक्त त्याचे काम करत होता. यामागे त्रास देण्याचा केव्हाच हेतू नसतो, अशी आपली बाजू मांडली. पण रणबीरने त्यावर काहीच न बोलता हे पुढे असेच सुरू राहिले तर मला पोलिसांत तक्रार दाखल करावी लागेल, असे सांगितले. पुढे बराच काळ चाललेल्या चर्चेनंतर वरिन्दर चावला यांची बाजू पटल्यावर संबंधित छायाचित्रकाराला घरी येऊन मोबाईल घेऊन जाण्यास रणबीरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2016 12:25 pm

Web Title: angry ranbir kapoor walks off with photojournalists mobile phone at night for clicking pictures
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 अक्षयच्या मुलाचे वडिलांच्या पावलावर पाऊल, ‘कुडो’मध्ये ‘ब्लॅक बेल्ट’
2 VIDEO: ‘सैराट’मधला ‘त्या’ सीनचा व्हिडिओ व्हायरल
3 EXCLUSIVE : ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘सैराट’मधील योगायोग
Just Now!
X