मराठी प्रेक्षकांना ज्या नावाने अक्षरश: वेड लावले होते, ज्यांनी मराठी रसिकांना तिकीटबारीवर खेचून आणलं होतं, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारत आहे.

काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीचा पहिला नव्हे अखेरचा सुपरस्टार आहे, आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा पहिल्यांदा सुरू केली ती काशिनाथनेच असे दमदार संवाद या टीझरमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या टीझरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची ओळख करण्यात आली. तर या दुसऱ्या टीझरमध्ये काशिनाथ घाणेकर यांच्यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं अतुलनीय योगदान आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस कसे आणले हे या टीझरमध्ये पाहायला मिळतं.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

सुबोध भावेसोबतच चित्रपटात सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.