24 April 2019

News Flash

अनिकेत विश्वासराव करणार वेब सीरिजमध्ये पदार्पण

हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीची निर्मिती असलेल्या पॅडेड की पुशअपचे दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केले आहे. ही सीरिज लवकरच हंगामा प्लेवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यानंतर अभिनेता अनिकेत विश्वासराव आता वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो ‘पॅडेड की पुशअप’मध्ये एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत तो दिसणार आहे. यामध्ये तो अंतर्वस्त्र विक्रेत्याची भूमिका करणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये अनिकेतसोबत तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अनिकेतने साकारलेला आदित्य हा एक मध्यमवर्गीय तरुण आहे. कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अंतर्वस्त्र विकण्याचं आपलं काम त्याला सुरूच ठेवावे लागणार आहे. त्याचवेळी, आपण हे काम करतोय हे आपल्या बायकोपासून लपवून ठेवायचं आहे आणि सासूच्या संशयी शोधक नजरेपासूनही त्याला वाचायचं आहे!

आपल्या वेबसिरीज पदार्पणाबाबत आणि त्यातील भुमिकेबाबत अनिकेत विश्वासराव म्हणाला, “गेल्या काही काळात माझ्यासमोर आलेल्या कथांमध्ये ‘पॅडेड की पुशअप’ ही सगळयात आगळीवेगळी कथा आहे. आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी शक्य ते सर्व काही करतानाच बायको आणि सासूपासून हे गुपित लपवून ठेवायचं अशी दुहेरी कसरत या अंतर्वस्त्र विक्रेत्याला करावी लागणार आहे. यातून प्रचंड विनोदी घटना घडतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. कॅफेमराठी आणि हंगामा प्लेसोबत डिजिटल शो करताना मला फारच आनंद झाला. या माध्यमामुळे मला एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले. हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीची निर्मिती असलेल्या पॅडेड की पुशअपचे दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केले आहे. ही सीरिज लवकरच हंगामा प्लेवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

 

First Published on December 6, 2018 4:38 pm

Web Title: aniket vishwasrao will be in web series soon padded ki pushup