24 September 2020

News Flash

तरूणींपासून लांब पळतोय अनिकेत विश्वासराव!

हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव

पोश्टर गर्लमध्ये अनिकेतने ‘बजरंग दुधभाते’ साकारला आहे.

हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अनिकेत विश्वासराव गेली बरीच वर्ष अगदी सहज तरूणींच्या मनाचा ठोका चुकवतोय. मात्र वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’मधून एक वेगळाच अनिकेत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. नेहमीच बिनधास्त, बेधडक वाटणारा अनिकेत पोश्टर गर्लमध्ये तरूणींपासून लांब पळताना दिसतोय. आणि असाच पळता पळता तो धडकला आहे ‘पोश्टर गर्ल’ला. पोश्टर गर्लमध्ये अनिकेतने ‘बजरंग दुधभाते’ साकारला आहे. व्यायाम करून चांगले शरीरसौष्ठव कमवणे येवढाच काय तो त्याच्या ध्यासामुळे शेतकरी असणाऱ्या या बजरंगरावांनी आता फक्त व्यायामाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
aniket vishwasrao 02
पोश्टर गर्लच्या काकांनी तिच्या स्वयंवरासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी हे आपले दुसरे उमेदवार. कॉलेजमध्ये मुली असतात म्हणून शिक्षण अर्धवट सोडणारे बजरंगराव पोश्टर गर्लसाठी काय काय करतात हे येत्या १२ फेब्रुवारीला तुम्हाला पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2016 1:18 pm

Web Title: aniket vishwasraos character in poshter girl
Next Stories
1 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘हलाल’
2 महिलेला मारहाणप्रकरणी नवाजुद्दीनविरोधात तक्रार दाखल
3 चित्रीकरणामुळे आशाताईंनी कार्यक्रम थांबवला
Just Now!
X