बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता करण जोहर हा यश जोहर यांचा मुलगा आहे. यश जोहर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी अग्निपथ, दोस्ताना अशा अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यश जोहर यांचे २००४ साली निधन झाले. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मित्र अनिल अबांनी यांनी करण जोहरला एक पत्र दिले. हे पत्र यश जोहर यांनी मृत्यूपूर्वी लिहिले होते आणि ते गुप्त ठेवले होते.

यश जोहर यांचे इंडस्ट्रीमध्ये अनेक मित्र होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनिल अंबानींपर्यंत अशा अनेकांचा समावेश आहे. यश जोहर यांचे अनिल अंबानी हे खूप जवळचे मित्र होते. याचा उल्लेख करण जोहरने त्याचे पुस्तक ‘सुटेबल बॉय’मध्ये केला आहे. करण जोहरच्या वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी अनिल अंबानी यांनी करणला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी मी तुला काही देऊ इच्छितो असे म्हटले होते.

त्यावेळी करण जोहर अनिल यांना भेटायला जाणार होता. पण मी स्वत:ला तुला भेटायला येईन असे अनिल म्हणाले होते. काही वेळानंतर अनिल यांनी करणची भेट घेतली आणि त्याला एक पत्र दिले. तुझ्या वडिलांनी हे पत्र निधनाआधी लिहिले होते. त्यांनी मला ते दिले आणि म्हणाले माझ्या निधनानंतर करणला दे असे अनिल म्हणाले.

यश जोहर यांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांच्या बिझनेसविषयी अनेक गोष्टी होत्या. तसेच कुणाकडून किती पैसे घ्यायचे, कुणाला किती द्यायचे हे सर्व यामध्ये सांगितले होते. हे पत्र वाचल्यानंतर करणला त्यांचा बिझनेस सांभाळणे सोपे झाले होते. याबाबत सर्व माहिती करणने त्याच्या पुस्तकात दिली आहे.