सिनेनिर्माते अनीस बाझमी यांचा आगामी सिनेमा मुबारका सिनेमा पुढच्या वर्षी २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा एक फोटो सिनेमाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. या सिनेमाची तारीख सांगताना ‘मुबारका’ने थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. लग्नाच्या पत्रिकेसारखी पत्रिका छापून त्या कार्डमधून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली आहे. या सिनेमात अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी असे तगडे कलाकार काम करणार आहेत. अनिल कपुरने खास मेसेज लिहीला की, ‘लग्नाचे आमंत्रण… ‘मुबारका’ अर्जुन कपूर, इलियाना, डिक्रूझ, अथिया शेट्टी.’
अर्जुन कपूर आणि अनिल कपूर पहिल्यांदा या सिनेमातून एकत्र काम करणार आहेत. काका, भाच्याने या सिनेमाच्या पत्रिकेचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
सध्या अर्जुन कपूर हाफ गर्लफ्रेण्ड या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ सिनेमाच्या सेटवर अर्जुनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ‘हाफ गर्लफ्रेण्ड’चा दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या नाकीनऊ आले असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आहेत. त्याच्या या बेजबाबदार वागण्यामुळे या दोघांमध्ये वादही झाले होते.
‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या पहिल्या शेड्युलचे शुटींग दिल्लीत नुकतेच पार पडले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील याच शुटींग दरम्यान अर्जुनच्या रोजच्या पार्ट्या आणि कामात त्याचा होणारा परिणाम यामुळे भरपूर रिटेक्स व्हायचे. त्याच्या याच रिटेक्समुळे मोहित जाम वैतागला होता. केवळ अर्जुनच्या सेटवर उशीरा येण्याची बाब असतील तर कदाचित मोहितने त्याकडे दुर्लक्षही केले असते. पण गोष्ट अर्जुनच्या सादरीकरणाची होती. तो अपेक्षेप्रमाणे सादरीकरण करत नसल्यामुळे त्याचा त्रास इतरांना होत होता. यामुळे मोहितचा पारा चढला आणि त्याने अर्जुनला चांगलेच सुनावले होते.
Wedding invites!!!! #Mubarakan @arjunk26 @Ileana_Official @theathiyashetty @Mubarakanfilm pic.twitter.com/B4FwsS89yK
— Jai Singh Rathore (@AnilKapoor) September 5, 2016
You are all invited !!! #Mubarakan @AnilKapoor @Ileana_Official @theathiyashetty @Mubarakanfilm 28th July 2017 !!! pic.twitter.com/iMI7L5JnvX
— Arjun Kapoor (@arjunk26) September 5, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 8:50 pm